मुख्यपृष्ठ
प्रस्तावना

जिल्हा प्रशासन व जिल्हा ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी सामाजिक न्याय भवन येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येते. मार्गदर्शन करण्याकरिता UPSC, MPSC परीक्षेत निवड झालेले अधिकारी यांना बोलविण्यात येते. 'प्रेरणा' अंतर्गत जिल्हा प्रशासन कामकाजाची माहिती होण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा मिळावी म्हणून 'एक दिवस प्रशासनासोबत' हा उपक्रम राबविण्यात येत आहे, यानुसार महिन्यातील तिसऱ्या शनिवारी विद्यार्थ्यांच्या एका ग्रुपची निवड करून त्यांना प्रशासकीय अधिकार्यांकडे वेळापत्रकाप्रमाणे माहिती प्राप्त करण्याकरिता पाठविण्यात येते.